मराठा समाजाला घटनात्मक आरक्षण देणारा भाजप हा एकमेव पक्ष- रावसाहेब दानवे

Foto

लातूर- खा. रावसाहेब दानवे लातूर येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले कि राज्य मागासवर्गीय आयोगाने मराठा समाज मागास असल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे आता या समाजाला स्वतंत्र १६ टक्के आरक्षण देण्यासाठी कसलीच अडचण येणार नाही. आयोगाने अहवाल दिल्याने आरक्षण आता घटनादत्त होईल. शिवाय, भारतीय जनता पार्टी असा एकमेव पक्ष आहे, या पक्षाने मराठा समाजाला इतर आरक्षणाला धक्का न लावता १६ टक्के आरक्षण देण्याचा ठराव केला असल्याचे खा. दानवे म्हणाले.

 

विरोधकांना आमची भीती वाटते

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विश्वासार्हता संपलेली आहे. भाजप देशात आणि राज्यात एक नंबरचा पक्ष आहे. त्यामुळे विरोधकांच्या पोटात आता भीतीचा गोळा उठला आहे. राज्य व केंद्र सरकारने जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणावरून ओबीसी व मराठा समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होतोय, असा आरोपही दानवे यांनी केला.